उदयनराजेंना मतदार लोळवल्याशिवाय राहणार नाहीत : आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

कराड : ‘सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बघून घेण्याची भाषा बोलतात. साताऱ्याच्या बाहेरही आयुष्य असते हे त्यांनी विसरू नये. निवडणुकीत हार-जीतच होत असते. तुम्हाला मतदार मताने बघून घेतील आणि लोळवल्याशिवाय राहणार नाहीत अशी जोरदार टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे.

Loading...

सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारासाठी कराडमधील जनता व्यासपीठावर रविवारी सकाळी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे, संभाजी मोहिते, प्रा. सुकुमार कांबळे,  प्रा. पार्थ पोळके आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उदयनराजेंनी आपल्या गादीची शोभा ठेवली पाहिजे. भिडे गुरुजींना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात, परंतु आम्ही सत्ता परिवर्तन करून भिडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.Loading…


Loading…

Loading...