राष्ट्रवादी हा पक्ष संभाजी भिडे चालवतात – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘शरद पवार हे पुरोगामी तर त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी हा पक्ष संभाजी भिडे चालवतात. या वक्तव्यावर आजही मी, ठाम असून आमची आघाडी काँग्रेसबरोबर असून काँग्रेसने कोणाबरोबर जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील आणि आघाडी झाली तर आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार असून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करेल’, असा टोला भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे’ असं आंबेडकर म्हणाले.