शरद पवारांनी मोदींना क्लिन चिट देऊन दुटप्पीपणा दाखवला,आंबेडकरांचा पवारांवर हल्लाबोल

prakash-ambedkar 06

टीम महाराष्ट्र देशा- राफेल करारावरून गदारोळ माजला आहे. यामध्ये काँग्रेसने घेतलेली भूमिका योग्य आहे मात्र शरद पवारांनी मोदींना यावरून क्लिन चिट देऊन दुटप्पीपणा दाखवला आहे अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केली. वंचित बहुजन आघाडीची विराट सभा सोलापुरातील पार्क मैदानावर पार पडली त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
शरद पवारांनी मोदींना यावरून क्लिन चिट देऊन दुटप्पीपणा दाखवला आहे . मी नाशिकमध्ये राफेल विमान कराराबाबत बोललो त्यानंतर काँग्रेसने आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र शरद पवार म्हणतात यात काहीही गडबड नाही. हे वक्तव्य करून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अपमानच केला. आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी कोण निर्लज्जपणा करणार हे पाहता येईल.

पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले

नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर