fbpx

उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? : आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा खडा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर मात्र कडाडून टीका केली आहे.

भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना आंबेडकरांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले.

शरद पवार १०० टक्के सेक्युलर आहेत पण त्यांचा पक्ष तसा नाही. त्यांच्या पक्षात भिडेंची पिलावळ आहे. त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादीसोबत जाणं मंजूर नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंचे जाहीरपणे कौतूक करतात. दयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? त्यामुळे आम्ही कदापी राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे.