राष्ट्रवादीत सनातन्यांची घुसखोरी, जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा : आंबेडकर

पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा असा सणसणीत टोला आंबेडकर यांनी लगावला आहे. ते पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर ?

एमआयएम सोबत आमची युती आहे. भिमा-कोरगांव प्रकरणात भिडेंना वाचवणारे राष्ट्रवादीत कोण आहेत ते आम्हाला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाली असून जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा. ज्या वेळी युतीसाठी काँग्रेसकडे हात पुढे केला होता तेव्हा त्यांचे डोळे झाकलेले होते. एमआयएमचा हात पकडल्यानंतर आता काँग्रेसचे डोळे उघडले.

You might also like
Comments
Loading...