नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात अडचणी आहेत आणि यापुढे येत राहतील. नारायण राणे यांनी हा प्रश्न अडचणीचा करून ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने याबाबत केलेल्या चुकीच्या मांडणीमुळे हे आरक्षण मिळण्याऐवजी त्याचा बट्टय़ाबोळ करण्याचे कामच नारायण राणे यांनी केल्याचा घणाघात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान , 20 मे रोजी प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथे धनगर आरक्षणासाठी अधिवेशन घेणार आहेत. धनगर समाजाने आरक्षणाबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आता आपला अहवाल सादर करू नये, असा सल्ला देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आता प्रकाश आंबेडकर यांच्या या टिकेला नारायण राणे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.