पुन्हा दंगली घडवून सत्ता काबीज करण्याचे सरकारचे मनसुबे : प्रकाश आंबेडकर

पुणे- सध्या सरकारविरोधात वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अयोध्येचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. त्यातून पुन्हा दंगल होईल, अशी भीती आहे. या सरकारच्याा पायाखालची वाळू सरकली असून, दंगल, भयाचे वातावरण पसरवून निवडणुका जिंकण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. त्यामुळे दंगली होऊ नये, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

‘जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, असे आवाहन करतानाच ‘समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

…उंदीर मारण्यासाठी टीक-ट्वेंन्टीची गरज आहे, बंदुकीच्या गोळीची नव्हे – प्रकाश आंबेडकर

Rohan Deshmukh

मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

Latur Advt
You might also like
Comments
Loading...