fbpx

आठवले यांच्यात बौद्धिक क्षमताच नाही – प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वेळोवेळी रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव देत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, आठवले यांच्यात नेतृत्वाची बौद्धिक क्षमताच नाही . ‘आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, यापुढील राजकारणाचा राष्ट्रीय अजेंडा माझाच असेल. रामदास आठवले यांच्यावर टीका करताना चळवळ आपणच चालवणार असल्याचा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवला.

तर दलित आणि ओबीसी समाज भाजप सरकारवर नाराज आहे. तरुणांमध्ये तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असंतोष धुमसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका या वर्षांतच होतील आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली, तशी भाजपची होईल अस भाकीत सुद्धा आंबेडकर यांनी केल आहे. ते ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात बोलत होते.