हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवर न घातल्यास दहशतवादी गटात रूपांतर होईल – प्रकाश आंबेडकर

मुंबई : बेलगाम हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवर न घातल्यास दहशतवादी गटात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जीवाला धोका आहे, असा गौप्यस्फोटही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट बंदनंतर पोलिसांकडून राज्यभरात कोंबिंग ऑपरेशन सुरू असून ते तात्काळ थांबवण्याची मागणीही आंबेडकर यांनी केला. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदु संघटनांवर समाजाचे नियंत्रण आहे. मात्र समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचेही निर्बंध नाहीत. आपला हेतू साध्य न झाल्यास या संघटनांचे कार्यकर्ते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवर घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

You might also like
Comments
Loading...