आभाळाचा खांब – एकनाथ शिंदे

प्राजक्त झावरे – पाटील :

हमने खुद ही जाना वो फरिश्ता है हमारे।
उन्होंने नहीं कहा उन्हें खुदा ने भेजा है।।

Loading...

कोल्हापुरातील पुरात अडकलेल्या एका कवी मित्राचा हा मेसेज मला आला आणि त्यात लिहले होते..हे तुझ्या भाईंसाठी … हो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसाठी.. (मी ठाण्यात राहत असल्याने त्याने आपल मला आपुलकीने ते पाठवले..! ) ..

आज महाराष्ट्रातील काना – कोपऱ्यातून समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांच्या बद्दल लिहले जात आहे, भरभरून स्तुती केली जात आहे. संकटात मदतीला येणारा देवदूत, महाराष्ट्राचे पालकमंत्री, लोकनेते, कर्मवीर काय नी किती उपाध्या, पदव्या त्यांच्या नावासमोर जनमानसातून जोडल्या जात आहेत..

कुठलाही बडेजाव न ठेवता थेट सामान्य माणसापर्यंत पोहचणे , ही त्यांची शैली सध्या अगदी तुरळक राजकीय नेतृत्वात दिसत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. बेताच्या परिस्थितीतून, वयक्तिक जीवनातील आघातातून हा माणूस ‘ माणुसकी ‘ घेऊन उभा राहिला आणि आज त्याच जोरावर महाराष्ट्राच्या हृदयात स्थान मिळवत आहे. शिवसेनेचे समाजकारण ८०% आणि राजकारण २०% हे प्रमेय प्रत्येक पद्धतीने नेहमीच सिद्ध केले ते एकनाथ शिंदे यांनीच..!

अगदी मागच्या वर्षीच केरळ मधील महाभयंकर परिस्थिती असेल की दुष्काळात बांदावर बसून शेतकऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलेला आधार असेल किंवा काल परवा च वांगणी – बदलापूर मधील ‘ ऑपरेशन महालक्ष्मी एक्स्प्रेस ‘ असेल कांबा गावातील अनेकांच्या सुटका असतील, त्यानंतर पुरग्रस्तांची केलेली शिबिरातील सोय असेल; सगळे ग्राउंड झीरो वरून होत.. अगदी तळातून..!

इतरांसारखे आपल्या सुसज्ज कार्यालयातून प्रशासनाला आदेश देवून अंमलबजावणी पडद्यावर पाहून मिडीयाला दणक्यात मुलाखती त्यांनाही सहज देता आल्या असत्या..

पण तसे काही न करता ते थेट उतरले.. कारण ते राजकारणी नाहीत आधी कार्यकर्ते आहेत.. आपल्या लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे, आपण कोण आहोत हा अहं न बाळगता समोर होऊन परिस्थितीवर मात करण्यासाठी सदैव उभे असणारे..

महाराष्ट्राचे पालक या भूमिकेतून त्यांना पाहायला आवडेल असे आता सारेच म्हणू लागले आहेत. सोशल मीडियावरून देखील शिवसैनिकांसोबतच इतर अनेक घटकांकडून ही मागणी चर्चिली जात आहे. त्यांची संघटन बांधणी अफाट तर आहेच परंतु राजकारणातील अशक्य गोष्टी शक्य करण्याची जिद्द देखील अफाट आहे. तिच्याच जोरावर त्यांच्यासारखा साधा शिवसैनिक, शिवसेना नेता तर झालाच परंतु आता महाराष्ट्राच्या पालक या भूमिकेत देखील उजळण्यासाठी सज्ज होत आहे..

संदेश पाठवणारा मित्र तसा राजकीय तटस्थ बाणा जपणारा पण त्याचा हा संदेश खूप काही सांगून गेला.. मग मीही त्याला लिहल..!

रवी मित्रा,
आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते प्रेमानंद रुपवते एक गोष्ट नेहमी सांगायचे.

‘आभाळाला खांब नाहीत मग हे आभाळ खाली का कोसळत नाही?’ असा प्रश्न एका भिख्खूने बुद्धाला विचारला. तेव्हा बुद्ध म्हणाले भिक्षा मागायला गेलेल्या भिख्खूला आपल्या ताटात असलेल्या भाकरीतली अर्धी भाकर स्वतःला ठेवून अर्धी भाकर देणाऱ्या म्हाताऱ्या महिलेसारखी माणसं समाजात कार्यरत आहेत, तोपर्यंत हे आभाळ कोसळणार नाही. आपल्या अंगी असलेल्या चांगुलपणाच्या सामर्थ्यावर त्यांनी हे आभाळ पेलून धरले आहे. तेच आभाळाचे खांब आहेत!

असाच हा माणूस आभाळाचा खांब आहे..! आणि राहील..!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट