प्राजक्ताने लहानपणी ‘या’ कारणामुळे खाल्ला आईचा मार; वाचा मजेशीर किस्सा

प्राजक्ता माळी

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयानंतर  प्राजक्ता आता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला असल्याचे तिने सांगितले.

यावेळी प्राजक्ता म्हणाली, ‘मी तेव्हा अकरावीत होती. लहानपणापासूनच तिला लिहिण्याची प्रचंड आवड होती. एकदा तिची एक डायरी आईच्या हातात लागली. त्यामधील काही गोष्टी वाचून आई इतकी संतापली की तिने प्राजक्ताला चक्क झाडूने चोप दिला होता. या प्रकारानंतर प्राजक्तानं रोजनिशी लिहिणं थांबवलं. किमान कुलूपबंद कपाट मिळेपर्यंत रोजनिशी लिहायची नाही असा निर्णयच तिने केला होता.’ असा एक मजेशीर किस्सा यावेळी तिने सांगितला.

सध्या प्राजक्ता माळी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करते. प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP