मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकतीच ‘रानबाजार’ ही तिची मराठी वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता प्राजक्ताने रानबाजार या सीरिजमधील एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामच्या (Instagram) स्टोरीवरून रानबाजार मधील एक प्रसंग शेअर केला. या व्हिडीओच्या सुरवातीला मकरंद अनासपुरे यांचे डायलॉग होते. ते म्हणतात की, ते म्हणतायंत की, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.”
पुढे व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येतो. ते म्हणतात की, “महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे”. अशी काही वाक्य प्राजक्ताने व्हिडीओद्वारे शेअर केली आहेत.
दरम्यान, अभिनेत्री तेजस्वी पंडितने (Tejasvi Pandit) देखील अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “रान बाजार”, काय मग बघताय ना?
महत्वाच्या बातम्या :