मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. तिची ‘रानबाजार’ ही वेबसीरिज सुपरहिट ठरली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाया या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने आपल्या कुटुंबियांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट खूप चर्चेत आहे.
स्त्रीभूण हत्या, गर्भपात, गर्भलिंग निदान यासारख्या विषयावर आधारित वाया या चित्रपटाची कथा आहे. प्राजक्ताने या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. प्राजक्ताच्या चित्रपटातील भूमिकेचे लोकं कौतुक करताना दिसत आहेत. आपल्या कुटुंबामध्ये स्त्रीयांना किती महत्त्व दिलं जातं? याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “आई-पप्पा तुमचे किती आणि कसे आभार मानू? आम्हा मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात. चित्रपट पोचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे”. सध्या प्राजक्ताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<