प्राजक्ता माळीची नवीन सुरुवात; ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह प्रेक्षकांच्या भेटीला

प्राजक्ता माळीची नवीन सुरवात; ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :  अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयानंतर  प्राजक्ता आता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे अक्षय बर्दापूरकर, अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते.

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ‘कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे. संग्रहातील कविता मराठी, हिंदी आणि इंग्रजी असून त्या अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत.’

पुढे ते म्हणते, अजिबातच क्लिष्ट नाहीत; त्यामुळेच त्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील, भावतील, आवडतील अशा आशा आहेत. आजवर प्रेक्षकांनी माझ्या अभिनयावर, नृत्यावर भरभरून प्रेम केले. वेळोवेळी मला प्रतिक्रियाही दिल्या. मला आशा आहे की, ‘प्राजक्तप्रभा’लाही रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. तसेच माझ्यावर, माझ्या कवितांवर विश्वास दाखवणाऱ्या ‘ग्रंथाली’सारख्या नामांकित प्रकाशनाचे तसेच ‘प्लॅनेट मराठी’च्या कुटुंबात मला प्रेमाने सहभागी करून घेणाऱ्या अक्षय बर्दापूरकर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.’ असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसापूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास भेट घेऊन येणार असल्याचे म्हंटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP