मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकतीच ‘रानबाजार’ ही तिची मराठी वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता यावेळी प्राजक्ताने चक्क एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार करत चाहत्यांसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
योगा आणि प्राणायम याची प्राजक्ताला खूप आवड आहे. प्राजक्ताने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्राजक्ता सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील एक खास गोष्ट म्हणजे, प्राजक्ता सूर्यनमस्कार करताना कुठेही दमली नसल्याचे दिसत आहे.
व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने मी आज १०८ सुर्यनमस्कार केले. योग दिन हा २१ जूनला असतो. कदाचित या दिवशी मी पुन्हा सुर्यनमस्कार करेन. पण तुम्हीपण माझ्याबरोबर करणार असाल तर…काय म्हणता करणार का? तुम्हाला जमेल तितके करा.”
महत्वाच्या बातम्या :