fbpx

देव द्या, देवपण घ्या ; स्तुत्य उपक्रम – मुखेडकर

nashik news देव द्या, देवपण घ्या ! उपक्रम

नाशिक :  गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा  उपक्रम स्तुत्य असून पर्यावरणाच्या रक्षणासाठीर्थी कृती समितीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आय.एम.आर.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के.मुखेडकर यांनी केले आहे.

देव द्या, देवपण घ्या या उपक्रमांतर्गत म.वि.प्र.समाजाच्या आय.एम.आर.टी. महाविद्यालयातील गणेश मूर्ती विद्यार्थी कृती समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी डॉ. मुखेडकर बोलत होते. गेल्या सहा वर्षांपासून महाविद्यालय देव द्या, देवपण घ्या उपक्रमात सहभागी होत असून यंदाच्या सातव्या वर्षी देखील महाविद्यालय या उपक्रमात सहभागी होत असल्याचे देखील डॉ. मुखेडकर  यावेळी म्हणाले.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करुन देव द्या, देवपण घ्या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. देव वपण घ्या हा उपक्रम विद्यार्थी कृती समितीमार्फत गेल्या ६ वर्षापासून राबविले जात असून यंदाचे सातवे वर्ष आहे. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात.

यंदा चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.के.मुखेडकर, विशाल गांगुर्डे, रोहित कळमकर, डॉ.जी.एम.अहिरे, प्रा.दिपाली माने, डॉ.पी.बी.रायते, प्रा.हर्षल देशमुख, डॉ.बी.दि.एकाडे, डॉ.बी.दि.गाडे, डॉ.एस.ए.गायकवाड, डॉ.डी.व्ही.नांद्रे, डॉ.व्ही.एन.भाबड, डॉ.जे.जे.कदम, प्रा.आर.एल.पगार, शुभम कुंदे, मेघा शहा, प्राची निकम, सायली बरके, राहुल लवटे, किरण पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.