Yashomati Thakur | बुलढाणा : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. संजय राऊत (Sanjay raut) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आल्या. अशातच माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही संजय राऊत यांचं कौतुक केलं आहे.
त्या म्हणाल्या, शिवसेनेचे संजय राऊत हा धमक असलेला माणूस आहे त्यामुळे ते खरं बोलतात आणि रेटून बोलतात. ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर उद्देश समतेचा आणि एकत्रितेचा आहे. या यात्रेत युवा नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “शिवसेनेला जे सहन करावं लागलं ते राहुल गांधींनी आणि काँग्रेसने सुद्धा सहन केलं आहे. सध्या ईडी आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत.”
तसेच “यंग इंडिया एक काँग्रेसची संस्था आणि एक एनजीओ (NGO) आहे त्या एनजीओला आम्ही काही मंडळींनी पैसे दिले होते. मात्र त्यांना सुद्धा ईडीने उचलून नेले. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा व त्यांचा मुलगा यांच्या खात्यात एवढे पैसे वाढत आहे यावर कोणी बोलायला तयार नाही”, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | मी पक्षाला आई मानतो, तिच्याशी गद्दारी करणार नाही – संजय राऊत
- Gajanan Kale । “अफजलखानाचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर…”; मनसे नेत्याचं वादग्रस्त विधान
- T20 World Cup | अर्धशतकासोबत विराटने केला ‘हा’ नवीन विक्रम
- IND vs ENG T20 WC | इंग्लडने भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले, सर्व बॉलर फ्लॉप!
- Chitra Wagh । “संजय राठोड विषय आता संपवूया”; चित्रा वाघ असं का म्हणाल्या?