पृथ्वी शॉ कडून पाँटिंगची प्रशंसा; ‘चक दे’ मधील शाहरुखशी केली तुलना

पृथ्वी शॉ

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वे सत्र 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. टूर्नामेंटचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात असणार आहे. आयपीएल सामन्यांसाठी संघ जोरदार मेहनत घेताना दिसत आहेत. सगळेच खेळाडू उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठी नेट्समध्ये घाम गळताना दिसतात. पण सातत्याने अपयशी ठरलेला पृथ्वी शॉ मात्र नेट्समध्ये सराव करत नाही याचा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला होता.

मागील आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरत होता. पण तो नेट्समध्ये फलंदाजीसाठी सरावाला देखील येत नसे, असा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला. या प्रतिभावान फलंदाजाला आयपीएल सुरू होण्याआधी सरावातील सवयी सुधाराव्या लागतील, यावर कोचने भर दिला होता.

मात्र या टिके नंतर देखील एक प्रशिक्षक म्हणून पृथ्वी शॉ याने पॉन्टिंगची जोरदार प्रशंसा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ”बॉस परत आले आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहे. मैदानात ते बॉससारखे असतात. मैदानाच्या बाहेर एका मित्रासारखे वाटतात. मला वाटतं की ते खूप चांगले व्यक्ती आहे. हे वर्ष कसं जातंय ते पाहूया.

पृथ्वी पुढं म्हणाला, ‘मला असं वाटतं की जेव्हा रिकी सर बोलत असतील त्यावेळी बॅक ग्राऊंडमध्ये शाहरुख खानच्या ‘चक दे’ सिनेमाचं गाणं वाजलं पाहिजे.’ असा म्हणत त्याने पाँटिंगची तुलना ‘चक दे’ मधील शाहरुखशी केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत जोरदार कामगीरी केली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा धडाकेबाज शतकी खेळी करत सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्यामुळे पृथ्वी शॉ कडून आता सगळ्यांनाच अपेक्षा आहेत. या आयपीएलमध्ये पुथ्वी शॉच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या