प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत तोडफोड; गटविकास अधिकाऱ्यांनाही मारहाण

prahaar sanghatna todfod

औरंगाबाद : अपंगासाठी असणाऱ्या निधीचं काय केलं तसेच तो निधी खर्च का केला नाही असा जाब विचारात औरंगाबादेत पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथं असणाऱ्या खुर्चांही त्यांनी इतरत्र फेकल्या. तसंच बीडीओ एम. सी. राठोड यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या आहेत. ग्रामसेवक गैरहजर असल्यानं ही मारहाण केल्याचं समजतं आहे. मारहाणीसोबतच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी कार्यालयाचीही तोडफोड केली आहे. या घटनेत त्याठिकाणी असणारा शिपाई जखमी झाला असून दोन्ही बाजूनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने त्याठिकाणी येवून वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून त्रास देत असतात असं देखील तक्रारीत म्हटलं आहे.