fbpx

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस निवडून येतात, मग आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे वारस वाऱ्यावर का ?

vaishali yede

टीम महाराष्ट्र देशा: राजकारणामध्ये एखाद्या नेत्याचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडणुकीत उतरवल जात, नेत्याच्या निधनाने निर्माण झालेली सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाकडून केला जातो. मग नेत्याच्या निधनानंतर निर्माण होणाऱ्या लाटेवर त्याचे वारसदार निवडून येत असतील, तर मग आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना वाऱ्यावर का सोडलं जात, असा प्रश्न यवतमाळ मतदार संघातील प्रहारच्या लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांनी केला आहे.

वैशाली येडे यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती, मध्यंतरी यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते करण्यात आले होते, यावेळी येडे यांनी केलेले भाषण गाजले होते. आ बच्चू कडू यांचा पक्ष असणाऱ्या प्रहारकडून यवतमाळ लोकसभेसाठी त्यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

 

येडे यांनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा संकल्प करत लोकसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. ‘राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांनाही लोकप्रतिनिधी करायला हवं’चा नारा येडे यांच्याकडून दिला जात आहे.