मुंबई : विधान परिषद (Legislative Council) पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीने प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना पाठिंबा दिला होता. भाजप (BJP) उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा सातव यांची बिनविरोध झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले आहेत.
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप (Bhai Jagtap), शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली. प्रज्ञा सातव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे युवक नेते होते. त्यांचा सर्वांशी जवळचा परिचय होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी आणि बाळासाहेब थोरात यांंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सहमती दर्शवली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार’
- ‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य