fbpx

शरद पवारांनी एकही आश्वासन पाळल नाही, माढ्यातून ‘हा’ पाणीदार नेता लढणार पवारांच्या विरोधात

टीम महाराष्ट्र देशा: सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नावर आवाज उठवणारे वॉटर आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी माढ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात लढण्याची घोषणा केली आहे. कदम हे मागील अनेक वर्षापासून दुष्काळी सांगोला भागामध्ये पाणी प्रश्नावर काम करत आहेत.

२००९ साली माढ्यातून निवडणूक लढवताना शरद पवार यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेत संगोल्यातून पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आपला शब्द पाळला नसल्याची टीका कदम यांनी केली आहे. तसेच जनतेच्या पाठींब्यावर इतिहास घडवण्यासाठी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी घोषित केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दंड थोपटले आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आघाडी न झाल्यास माढ्यातून लढण्याच्या तयारीत आहे.

कोण आहेत प्रफुल्ल कदम
प्रफुल्ल कदम यांना जलतज्ञ म्हणून ओळखले जाते
कदम यांनी शेतकऱ्यांना संघटीत करत वॉटर आर्मी पआणि किसान आर्मीची स्थापना केली आहे.
सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नावर फोन आंदोलनाद्वारे सरकारची कोंडी करण्यात कदम यांचा मोठा सहभाग