कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे यावरून आता राष्ट्रवादीमध्ये यादवी सुरु झाल्याच दिसत आहे, पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे खा. तारिक अन्वर यांनी तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, तसेच पक्षाला देखील सोडचिट्ठी दिली आहे.
तारिक अन्वर यांनी पवारांचं विधान चुकीच्या पद्धतीनं घेऊन राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका बेजबाबदारपणाची आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी राफेल खरेदीची संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी करतानाच, मोदी सरकारचा बचाव देखील केला होता. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या, आता यावरूनच खुद्द राष्ट्रवादीमध्येच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दरम्यान, तारिक अन्वर यांच्नी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने उत्तर भारतामध्ये पक्षाची पीछेहाट होवू शकते.

प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करताना तारिक अन्वर यांनी पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहेत असं म्हटलं आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एकदा शरद पवारांना फोन करून विचारायला हवं होतं तसेच आम्हाला याची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं देखील म्हटलं आहे. तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकसभेच्या खासदारकीचा प्रश्न अध्यक्षांच्या अखत्यारित येतो. राजीनामा पवारांकडे सोपवला असता विचार केला असता, असंही राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?