‘सौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

नवी दिल्ली : देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेड्यांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या जनतेला वीज जोडणी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेड्याला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेड्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभ मिळाला आहे.

You might also like
Comments
Loading...