Pradeep Kanase | पुणे : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांनी गेल्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. केरे यांच्यासह अन्य काही समन्वयकांवर मराठा क्रांती मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. भाजप नेत्यांची नावे देखील या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आरोपांमुळे रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आता आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील प्रदीप कणसे (Pradeep Kanase) यांनी आता पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यामध्ये विवेकानंद बाबर, अनिरुद्ध शेलार, योगेश केदार, संदीप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदीप कणसे यांच्यासह काही इतर मराठा कार्यकर्त्यांवर IPC 306, 500, 501, 511 या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान प्रदीप कणसे यांनी आज सकल मराठा समाजाच्या वतीने आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. राज्यकर्ते व समाजातील दलालांनी मिळून मराठा समाजाची फसवून केल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणालेत प्रदीप कणसे?
प्रदीप कणसे (Pradeep Kanase) म्हणाले, “२०१६ मध्ये जगाला हेवा वाटेल, असे मराठा क्रांती मोर्चे महाराष्ट्रात पार पडले. मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी या माध्यमातून पोहचवल्या गेल्या. मात्र याच मराठा समाजाला गालबोट लावण्याचे काम काही विकृत मंडळींनी केले. मराठा क्रांती मोर्चा या टायटलची मोडतोड करुन मराठा ठोक मोर्चा केले. मराठा समाजातील लोकांना उसकवण्याचे काम करण्यात आले. मराठा तरुणांनी बलिदान देण्यासाठी पुढे यावं, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. यानंतर महाराष्ट्रात ४२ तरुणांनी आत्मबलिदान दिलं. या आत्मबलिदानामुळे तत्कालीन राज्य सरकार प्रशेरमध्ये होते. चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनात बसलेल्या लोकांशी चर्चा करायला सरुवात केली. यावेळी मुख्य मागण्या मागे राहील्या आणि वैयक्तिक मागण्या पुढे आल्या. त्यामुळे आम्ही दलाल हा शब्द वापरला आहे. जे समाजाचे प्रश्न शासन दरबारी घेऊन गेले तेच लोक गलेलठ्ठ झाले. गेल्या १० दिवसांपासून जी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरते त्या क्लिपमुळे या विषयाला तोंड फुटले आहे.”
“व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी. त्यात चंद्रकांत पाटील यांचे नाव आहे. चुकीच्या पद्धतीने मराठा आंदोलनाचा स्वत:साठी फायदा करुन घेतला. ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख झाला. हे आर्थिक व्यवहार कुणाचे झाले. ते कुणी कले. यात प्रामुख्याने चंद्रकांत पाटील यांचे नाव येते. चंद्रकांत पाटील आज पुण्याचे पालकमंत्री आहेत. सरकारमध्ये मंत्री आहेत. आमची प्रमुख मागणी आहे. मराठा उपसमितीवरती, पुण्याच्या पालकमंत्री पदावरती तसेत मंत्रीपदावरती राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. येणाऱ्या काळात त्यांनी राजीनामा दिला नाही तर मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल. व्हायरल ऑडिओ क्लिपवर जाब विचारणाऱ्या तरुणांवर केसेस टाकण्याचे काम होत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये ज्या लोकांची नावे आहेत ती लोक आज एकनाथ शिंदे यांच्या आजूबाजूला आहेत. सामाजिक गद्दारांना राजकीय गद्दार पाठीशी घालतोय, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. आम्ही ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी केली पण मुख्यमंत्री यावर बोलत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या बंगल्यावर आंदोलन करु,” असा इशारा प्रदीप कणसे (Pradeep kanase) यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Pravin Darekar | “सोंगाड्या, कोणी नाच्या म्हणतं मी तर रानडुक्कर बोललो” ; प्रवीण दरेकरांचा भास्कर जाधवांवर घणाघात
- Viral Video | एक हात असलेल्या ‘या’ माकडाचा आश्चर्यचकित करणारा पाहा व्हिडिओ
- Devendra Fadnavis | “…म्हणून रश्मी शुक्ला यांच्यावर खटला चालू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Chandrashekhar Bawankule | भाजपने कधीही उध्दव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Radhakrishna Vikhe Patil । “पवारांचे घर फोडायला आम्ही…”; विखे पाटलांचे राेहित पवारांना प्रत्युत्तर!