‘रोहित पवारांनी आता अखिल विश्वाला विविध विषयांवर ज्ञान पाजळण्याचे काम बंद करावे’

pradip gawade

पुणे – बारामती अॅग्रोचे आणि इतर काही कंपन्यांचे फीड दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. बारामती अॅग्रोमुळे पुरंदरसह अन्य तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसल्याचा दावा एका तरुण शेतकऱ्याने केला आहे.

पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांना योगेश चौरे या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यामतून वाचा फोडली आहे. चौरे म्हणाले, शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. रोहित पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे साधी शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याबाबत चौरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान,पोल्ट्री व्यवसायिकांचे झालेले लाखोंचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी देखील चौरे यांनी केली आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकारण करायचे आणि शेतकऱ्याला अडचणीत आणायचे हा यांचा धंदाच आहे. रोहित पवारांनी आता अखिल विश्वाला विविध विषयांवर ज्ञान पाजळण्याचे काम बंद करावे आणि स्वतःची कंपनी कशा प्रकारे पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन देशोधडीला लावत आहे ते पाहावे. रोहित पवारांच्या कंपनीच्या चुकीमुळे जर पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी त्याची नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी अशी जोरदार मागणी गावडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP