fbpx

पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारिक ज्ञान देखील आवश्यक : रोहन देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : कठीण परिस्थितीवर मात करत १०वी व १२ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी कौतुकाची थाप दिली.

तुळजापूर येथे लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लि. सोलापूर, शाखा तुळजापूर च्या वतीने १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारिक ज्ञान देखील संपादन करा, गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पाठीशी मोठा भाऊ या नात्याने खंबीरपणे उभा राहीन, माझ्या जन्मगावासाठी, तिथल्या लोकांसाठी जमेल ते सर्व करण्यासाठी, विधायक काम करण्यासाठी माझी तळमळ राहील असे रोहन देशमुख यावेळी म्हणाले.

तसेच दरवर्षी लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने २०० विद्यार्थी दत्तक घेतले जातात. या सत्कार सोहळ्यात रोहन देशमुख यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.