लग्नासाठी प्राचीने ठेवली ‘ही’ अट…

प्राची

मुंबई : अगदी कमी वयातच बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. बॉलीवूडमध्ये कमी वयातच तिने आपले भक्कम स्थान निर्माण केले. प्राची देसाई ही अशी अभिनेत्री जी बॉलिवूडमधील कोणत्याही विवादामध्ये सापडलेली नाही.

प्राचीने सध्या बॉलीवूडमधून ब्रेक घेतला आहे. बऱ्याच दवसांपासून तिने कोणत्याही प्रोजेक्टवर काम केले नाही. दरम्यान, प्राची देसाईने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर आणि करिअर बद्दल भाष्य केलं आहे. त्या मुलाखतीत तिने लग्नाबाबतही काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

मुलाखतीदरम्यान प्राचीला लग्नाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी प्राची म्हणाली, ‘मी एका अशा कुटुंबात लहानाची मोठी झाले आहे. ज्या ठिकाणी मी सध्या स्वतःला लग्नासाठी सुरक्षित मानत नाही. मी माझ्या करिअरच्या कठीण काळातून जात असेन किंवा माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नसेल तर मी लग्न करेन. पण सध्या ते शक्य नाही.’

प्राची पुढे म्हणाली, ‘मी जेव्हा लग्न करेन त्यावेळी त्या मुलाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहणं गरजेचं आहे. मी माझे विचार आणि माझे सिद्धांत यावर माझं जीवन जगू इच्छिते आणि मला माझं स्वातंत्र्य फक्त लग्नासाठी गमवायचं नाही. लग्ग्न करण्यासाठी अजून बराच वेळ आहे. पण जर मला लग्न करायचे असेल तर मी परफेक्ट मुलाशीच लग्न करण पसंत कारेन, जर माझ्या आयुष्यात येणारा मुलगा माझं स्वातंत्र्य तसंच ठेवून माझ्यासोबत आयुष्य शेअर करायला तयार असेल तर मी नक्की लग्न करेन. असेही म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या :