fbpx

प्रभाकर देशमुख-विलासराव घुमरे यांची भेट,माढा मतदार संघातील राजकीय घडामोडींना आला वेग

करमाळा /प्रतिनीधी : माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माढा लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. पक्षाने आपल्याला माढ्यातुन तिकीट द्यावे  यासाठी त्यांनी अनेक दिवसांपासून  माढा, करमाळा, सांगोला , माळशिरस , माण खटाव या तालुक्यात विविध नेत्यांच्या गाठीभेटी दौरे आयोजित केले आहेत.

आज त्यांनी करमाळा तालुक्याचे किंगमेकर म्हणुन ओळख असलेले नेते बागल गटाचे मार्गदर्शक प्रा. विलासराव घुमरे यांची भेट घेतली. यामुळे करमाळा अन माढा या तालुक्यात पुन्हा एकदा खासदारकीच्या चर्चेला उधाण आलं आहे. करमाळा तालुक्यातील वीट येथे स्व. दिगंबरराव मामा बागल क्रिकेट चषकाच्या उद्घाटनासाठी  आले होते. त्यांनतर दुष्काळी गावात प्रभाकर देशमुख यांनी दौरा केला.