प्रभाकर देशमुखांच्या ऊमेदवारीला माढ्यातील नेतेमंडळींचा जाहिर पाठिंबा

कुर्डूवाडी : लोकसभा निवडणुक काही दिवसांवर आली असताना माढ्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन माजी विभागिय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे दौरे ही दिवसेंदिवस वाढत आहेत. पक्षाचे सर्वे सेवा शरद पवार यांनीच आपल्याला गाठीभेटी घेण्यास सागिंतले असे सांगत देशमुख यांनी माढा लोकसभा मदतार संघात सातत्याने भेटी घेण्यावर भर दिला आहे. आज देशमुख यांनी बारलोणी ता.माढा येथे सवांद बैठक घेतली असता पक्षाचे अनेक मातब्बर नेते यांच्यासह आजीमाजी पुढाऱ्यांनी देशमुखांचे जंगी स्वागत केले.

बारलोणी येथे झालेल्या सवांद बैठकीला शरद पवारांचे विश्वासु व निकटवर्तीय म्हणुन ओळख असलेले माजी आमदार विनायकराव पाटिल , पक्षाचे जेष्ठ नेते वामनभाऊ ऊबाळे , माजी. जि.प. सदस्य प्र. सर्जेराव बागल , आ. बबनदादा शिंदे यांचे पुतणे पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे , ड्रीम फाऊंडेशनच्या संचालिका हर्षदा देशमुख-जाधव , संभाजी ब्रिगेडचे प.महाराष्ट्र प्रवक्ते हर्षल बागल, विठ्ठलराव सहकारी सा.का. सचांलक सुरेष बागल , पचांयत समिती सदस्य शहाजी बागल , सुरेष बागल , सरपंच संजय लोंढे , यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक गावपुढारी ऊपस्थित होते.

कोण काय म्हणाले..?

सुरवातीला मी जलयुक्तच्या कार्यात सहभाग घेतल्यानंतर देशमुख यांनी दोन कोटी रुपएे तात्काळ मंजुर केले होते . राज्यात जलयुक्त व जलसंधारण क्षेत्रात देशमुख साहेबांचे मोठे योगदान असुन दिल्लीत आम्हाला तुमची गरज आहे.

धनराज शिंदे (माढा ता. पं. समिती सदस्य)

प्रभाकर देशमुखांना संधी मिळाल्यास गाव एक शिक्याने पाठिशी ऊभा राहिल.

– संजय लोंढे (सरपंच बारलोणी)

माढा करमाळा हे तालुके राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत. या दोन्ही तालुक्यात प्रभाकर देशमुखांना कसलीच अडचण येणार नाही . या भागाशी त्यांचे जुने नाते आहे. पवार साहेबांनी त्यांना संधी द्यायला काहीही हरकत नाही.

वामनभाऊ ऊबाळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेष्ठ नेते-)

34 वर्षापासुन माढा करमाळा तालुके प्रभाकर देशमुख यांना ओळखतात. एक अधिकारी म्हणुन त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सेनानिवृत्तीनंतरही त्या्चे कार्य सुरुच आहे. जर पक्षाने संधी दिली तर विजय नक्कीच आहे.

विनायकराव पाटील (माजी आमदार)