माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखच माढ्याचे प्रबळ दावेदार?

प्रभाकर देशमुख

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार हे माढा लोकसभा लढविणार नाहीत असा खुलासा केला आहे. दरम्यान सांगोल्यात आयोजित दुष्काळ सभेवेळी शरद पवार हे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना आपल्या गाडीतून घेवून गेल्याने. उमेदवारीसाठी त्यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दिल्याचे दिसत आहे.

मागील आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पक्षाची बैठक पार पडली. यावेळी माढ्याचे विद्यमान खासदार असलेले  विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी खुद्द पवार यांनाच उभे राहण्याची विनंती केली होती, यावर मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाहीये. परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीवर विचार करेन . असे विधान त्यांनी केले. त्यामुळे ते स्वत: माढ्यातून निवडणूक लढू शकतात अशी अटकळ बांधण्यात येत होती.

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार हे माढा लोकसभा लढविणार नाहीत, असा खुलासा केला आहे . यावरून तूर्तास पवार लोकसभा लढविणार या चर्चेला पूर्णविराम लागलेला दिसतो . सांगोल्यातील झालेल्या दुष्काळी सभेनंतर शरद पवार स्वतः माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. त्यामुळे माढ्यासाठी त्यांनी प्रभाकर देशमुख यांना पसंती दिल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना यंदा थांबण्याचे आदेश दिल्याचं देखील बोलल जात आहे