करमाळा : प्रभाकर देशमुख-रश्मी बागल भेट, राजकीय चर्चांना ऊधाण

प्रभाकर देशमुखांनी केली मोहिते-पाटील विरोधकांची मोट बांधायला सुरुवात ?

करमाळा/ प्रतिनीधी : माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इच्छुक असलेले माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शनिवारी करमाळा येथे येऊन कमलाभवानी चे दर्शन घेतले. देशमुख यांच्या दौऱ्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने करमाळा दौऱ्यावर विविध राजकीय चर्चांना ऊधाण आले आहे. कमलाभवानीच्या दर्शनानंतर प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी  बागल यांच्या  निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका,पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी

माढा लोकसभा मतदार संघातुन विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटिल यांनीही आपण निवडणुक लढवण्यास सज्ज आहेत.असे सांगितले आहे  तर दुसऱ्या बाजुला माजी आयुक्त प्रभाकर देशमुख देखील याच मतदार संघातून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रशासकिय कार्यात ठसा ऊमठवलेले आणी दुष्काळमुक्तीसाठी राज्यभर दौरे करित असलेले तसेच जलसंधारण , वाँटरकप स्पर्धेत विशेष योगदान देत प्रभाकर देशमुख यांनी विकास कार्याला वाहुन घेतले आहे. या पार्श्व भुमीवर प्रभाकर देशमुख यांनी देखील पक्ष श्रेष्ठीकडे ऊमेदवारीची मागणी केली आहे.

विजयदादांचा आपण प्रचंड आदर करित आहोत. पण मी देखील पक्षाकडुन निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असेही देशमुख म्हणाले आहेत. शेवटी पक्षप्रमुख घेतील तो निर्णय मान्य असेल. पण माण खटाव तालुक्यात दुष्काळमुक्तीचा जो पॅॅटर्न राबवला तो पॅॅटर्न  पुर्ण माढा लोकसभा मतदार संघात राबवणार असल्याचे त्यांनी बोलताना सागिंतले. माण खटाव तालुक्यातील दोन गावे राज्यात वाॅॅटरकप स्पर्धेत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. दुष्काळाचा कलंक मिटवण्यासाठी माझी धडपड आहे असेही देशमुख म्हणाले. मी कमलाभवानी च्या दर्शनाला आलो होतो. रश्मी बागल घरी आहेत हे समजले सदिईच्छा भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही इतर कारण नाही. फक्त सदिच्छा भेट आहे .असे ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना देशमुख यांनी सांगितले .

माढ्याचा तिढा …म्हणून मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे : प्रभाकर देशमुख

जयदत्त क्षीरसागर थेट मोदींच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

You might also like
Comments
Loading...