ग्रामीण भागात ‘आप’ची दमदार एन्ट्री

arvind kejrival

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पदार्पण केले आहे. ‘आप”ने प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका लढवल्या आहेत. पक्षाच्या जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि १४५ पेक्षा अधिक उमेदवार विजयी ठरले आहेत. ३०० उमेदवारांपैकी १४५ उमेदवार निवडून आल्याने विजयी होण्याचे प्रमाण ५० % ठरले आहे. ही लक्षवेधी कामगिरी आहे. से पत्रकार परिषदेत आपचे नेते मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे.

आप ने लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, द्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे गडचिरोली सारख्या अविकसित भागात ही तब्ब्ल २९ उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महाराष्ट्रातील काँग्रेस – भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी यांची सर्वच क्षेत्रात वर्चस्व असताना विकासाचे कल्याणकारी प्रारूप जनतेला भावते आहे ही मोठी आशादायक बाब आहे. विकासाचे आप चे प्रारूप ह्या यशामागे आहे असे आपचे नेते मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये विरोधकांनी साम दाम दंड अशी सर्व हत्यारे वापरली तरीही आप चे सदस्य विजयी झाले हे विशेष आहे. हा अरविंद केजरीवाल यांच्या विकासनीतीचा विजय आहे. जनतेच्या वीज, आरोग्य सुविधा, पाणी, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण अश्या मूलभूत समस्या सोडवत केलेल्या कामाचे आकर्षण शहरी तसेच ग्रामीण जनतेसही आहे ही बाब यातून अधोरेखित होत आहे. शेतकरी नेते आणि उत्तम संघटक अशी ओळख असलेल्या राज्य पक्ष संयोजक श्री रंगा राचुरेजी यांच्या मार्गदर्शनात या निवडणुका लढवल्या गेल्या. असे आप चे पुणे जिल्हा संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या