मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागलं आहे. तसेच बंडखोर आमदार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांचे पुतळे जाळून शिवसैनिक त्यांचा निषेध करत आहेत. यानंतर आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक होत आहे.
मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कार्यकारिणीची बैठक होत आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहिल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. शिवसेनेचे मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्त्वाशी बांधिलकी कायम राहिल. असे हे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, एकीकडे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची आज बैठक झाली. आजच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. सरकार म्हणून आम्ही अजूनही कार्यरत आहोत. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु आहे. महाविकास आघाडीची लिगल टीमही कार्यरत झाली आहे. हंगामी अध्यक्षपदाबद्दल कोणतीही चर्चा करीत नाही अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<