नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही : उद्धव ठाकरे

uddhav-thackeray

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहेत . तसेच यंदा लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढण्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांच्या नेते पदासाठीचा ठराव रामदास कदम यांनी मांडला त्याला गजानन कीर्तिकर यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपदही कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनोहर जोशी, सुभाष देसाई, सुधीर जोशी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री, आमदार उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत भाजप ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून सत्तेत येते. असे भाजपबद्दल जनतेचे मत आहे. तसेच भाजपला फक्त निवडणुकीच्या वेळी पाकिस्तान आठवत. नितीन गडकरींनी नौदलाची नालस्ती केली. नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ठाकरे म्हणाले. यापुढे शिवसेना देशातील प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार असल्याची घोषणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज केली.