नाद करा की.. पण आमचा कुठं?…भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

टीम महाराष्ट्र देशा- एअर स्ट्राईक करणाऱ्या भारतीय हवाई दलाची शक्ती आता आणखी वाढणार आहे. अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली आहेत. चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले.

Loading...

चिनूक अत्याधुनिक आणि अनेक मोहिमांसाठी वापर करता येईल असे हेलिकॉप्टर आहे. याची भारवहन क्षमता जास्त असल्याने लष्कराला यामुळे फायदा होणार आहे. चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात.

दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे हे पाऊल मानले जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील