पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे; तृप्ती देसाईंची मागणी

rohit pawar vs trupti desai

पुणे – कोरोना काळात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मोठमोठे उद्योग अडचणीत आले आहेत. या महामारीच्या काळात इतर व्यावसायिकांच्या सोबत पोल्ट्री व्यावसायिक देखील अडचणीत आले असल्याचे चित्र आहे. यातच आता टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे.

बारामती अॅग्रोचे आणि इतर आणि काही कंपन्यांचे फीड दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. पुरंदरसह अन्य तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसला आहे. पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांना योगेश चौरे या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यामतून वाचा फोडली आहे.

पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याबाबत देखील योगेश चौरे यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप चौरे यांनी केला आहे. दरम्यान,पोल्ट्री व्यवसायिकांचे झालेले लाखोंचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी देखील चौरे यांनी केली आहे.

दरम्यान, आता या प्रश्नासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई मैदानात उतरल्या असून अत्यंत आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. बारामती ॲग्रोचे फीड दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले असा जर तरुण शेतकऱ्याने आरोप केला असेल तर त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे. तसेच ही समस्या का उद्भवली ? काय कारण आहे? याचे जाहीर उत्तर सुद्धा बारामती ॲग्रोकडून येणे गरजेचे आहे.

राज्यात वेगवेगळ्या प्रश्नांवर रोहित पवार बोलत असतात, आक्रमक भूमिका घेत असतात परंतु या शेतकऱ्यांची त्यांनी भेट का घेतली नाही तसेच त्यांनी जी तक्रार दिली आहे या तक्रारीची दखल का घेण्यात आली नाही, याचीही चौकशी करण्यात यावी. यापुढे देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी न घाबरता ‘बारामती ॲग्रो’विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी असा सल्ला देखील देसाई यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP