बारामती अॅग्रोचे फीड दिल्या नंतर कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद, तरुण शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

rohi pawar

पुरंदर – कोरोनाच्या काळात समाजातील सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यावसायिक देखील यापासून वाचू शकले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही अफवांच्यामुळे  हजारो पोल्ट्रीधारकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले होते. यातुन कसेतरी सावरत असतांना, अनेक पोल्ट्रीधारकांना आता कंपनीच्या चुकीमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

बारामती अॅग्रोचे फीड दिल्या नंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. बारामती अॅग्रोमुळे पुरंदरसह अन्य तालुक्यातील  पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसल्याचा पर्दाफाश एका तरुण शेतकऱ्याने केला आहे.

आ.रोहित पवार यांना खडेबोल सुनावत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांना योगेश चौरे या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्यामाध्यामतून वाचा फोडली आहे.  शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप देखील चौरे यांनी केला आहे. कंपनीचे डॉक्टर पाणी, कोंबड्यांची लाळ,ब्लड चेक करण्यासाठी घेऊन गेले मात्र दोन महिन्यापासून रिपोर्ट आला नाही. नेमकी समस्या काय आहे हे देखील सांगत नसल्याचे सांगत पोल्ट्री व्यवसायिकांचे झालेले लाखोंचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी देखील चौरे यांनी केली आहे.

दरम्यान,रोहित पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे साधी शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याने व्यथित झालो आहोत असे देखील चौरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP