मुसळधार पावसामुळे पोल्ट्री फार्मचे पत्रे गेले उडून, लाखो रुपयांचे नुकसान

broiler chicken

नाशिक – महाराष्ट्राच्या किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. रायगडमधल्या अलिबाग, श्रीवर्धनला चक्रीवादळ ताशी १०० किलोमीटरहून अधिक वेगाने धडकले आहे. सध्या या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागांवर घरची छप्परे उडून गेली आहेत. निसर्ग चक्रीवादळने रौद्ररुप धारण केले असून मुंबईतही याचा प्रभाव दिसून येत आहे. वाऱ्याच्या जोरामुळे काही भागांत विजेचे खांब, मोठी झाडे उन्मळून पडले आहेत.

येवला तालुक्यातील अंदरसूल गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून २ ते ३ किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. तसेच शेडची पडझड झाली. यामुळे कोंबड्या पाण्यात भिजल्या, काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

गजानन देशमुख या शेतकऱ्याच्या शेतातील पोल्ट्री फॉर्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजर कोंबड्या होत्या. मात्र, आजच्या पावसामुळे कोंबड्या पावसात भिजल्या. तसेच काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये जवळपास २२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

जम्मूत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी घडली एक धक्कादायक घटना

‘निसर्ग’चा तडाखा : घरावरील पत्रे गेले उडून,झाडे पडली उन्मळून

‘दाऊदच्या माणसांनी धमक्या दिल्या मात्र न घाबरता आपल्या भुमिकेवर ते ठाम राहीले’