कोरोनानंतर बर्ड फ्ल्यू’चे सावट ; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसाय संकटात

bird flue

 औरंगाबाद : कोरोनानंतर मराठवाड्यात ‘बर्ड फ्ल्यू’ संक्रमणाचे सावट पसरले असून, यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. या साथरोगाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी विभागातील पोल्ट्री फार्म आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रेकर यांनी इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच १ कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांची तपासणी केल्यानंतर जर त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न होत असेल, तर ते पक्षी नष्ट करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यात बर्ड फ्लू पसरला असल्याचे निश्चित झाले असून यापूर्वीही हा आजार येऊन गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेने काम करण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व पोल्ट्रींची तपासणी करण्याचे नियोजन सुरु आहे. एक कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्रींबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शासनाच्या सूचना येण्यापूर्वीच अनेक ठिकाणच्या पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लातूर, परभणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. जिथे-जिथे धोक्याची शक्यता आहे, तेथील नमुने संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी रात्री ८ वाजता विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बर्ड फ्ल्यू’ संक्रमणाच्या अनुषंगाने चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी विभागात कोरोना लसीकरणाबाबत काय तयारी झाली आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हानिहाय परिस्थितीबाबत समन्वयाने खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या