भाजपा मंत्र्यांचे गावेच नाहीत ‘खड्डेमुक्त’

lonikar bjp

परतूर/सोपान रोडगे: जालना-नांदेड रस्त्यापासून १५ कि.मी अंतरावर असणाऱ्या परतुरवरून जाणारा राज्यमार्ग क्र. २५३ वरील खड्डे बुजवण्यासाठी राज्यशासनाने सुमारे ८५ लाख एवढा निधी २०१६ ला मंजूर केला होता मात्र लोकप्रतिधींचे दुर्लक्ष , कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या वाटाघाटी झाल्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले खरे मात्र काही महिन्यातच रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे एका महिन्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते की येत्या १५ डिसेंबर पर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्त करू परंतु भाजपला आपल्याच घरातील खड्डे बुजवायला जमले नाही ते भाजपा राज्याची गोष्ट करतेच कशाला आशा प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांचा मतदार संघ असलेल्या परतूर शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत, २०१६ मध्ये सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केला गेला. दुरुस्तीनंतर ४ महिन्यांच्या कालावधी सुद्धा पूर्ण झाला नाही व रस्ता खराब झाला.

Loading...

परतूर – सेलू रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी २०१६ मध्ये याच कालावधीत टेंडर काढण्यात आले होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचे देयक देखील कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याचे येथील अधिकारी सांगतात, मात्र रस्त्यावर गुडघ्यापर्यंत खोल खड्डे असल्याने मागील काही दिवसात लहान मोठे अपघात सुद्धा झाले आहेत, आतापर्यंत कोटी रुपये खर्च करूनही रस्ता चांगला का होत नाही असा प्रश्न परतुरकरांच्या मनात घर करून आहे,

परतूर-सेलू या मार्गावरील साईबाबा मंदिर ते चिंचोली या १० कि.मी रस्त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
-व्ही.बी.मस्के कनिष्ठ अभियंता सा. बा.विभाग,परतूर

कोट्यावधी रूपाचा निधी उपलब्ध असून देखील वाहन धारकांना खड्याचा त्रास सहन का करावा लागतो हि खूप खेदाची बाब आहे तरी लोकप्रतिनिधींनी या कामी आपले हातपाय हलवून कामाला सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत व रस्ता खड्डे मुक्त करावा.
-संदीप जगताप नागरीक, परतूरLoading…


Loading…

Loading...