खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून आगळ्या पद्धतीने केला निषेध

औरंगाबाद : महापालिका अनेकदा विनंती करूनही रस्त्यातील खड्डे बुजवत नाही याचा निषेध करण्यासाठी या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून आगळ्या पद्धतीने आंदोलन केले.

bagdure

हर्सूल, भगतसिंग नगर ते पिसादेवी रोड या रस्त्यावर जवळपास २० ते २५ हजार लोकांची वस्ती आहे आणि या व्यतिरिक्त न्यू हायस्कूल हर्सूल, संस्कार बालक मंदीर, अगस्ती प्राथमिक शाळा, नाथ अकॅडमी इ. शाळा असून या सर्वांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.

मात्र गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्त्याची फारच गंभीर परिस्थिती झाली आहे आणि आता त्यात पावसामुळे अजूनच चिंताजनक परिस्थिती झाली आहे जागोजागी खड्डे आणि त्यात पाणी चिखल या मुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी म.न.पा. आयुक्त आणि महापौर यांना येथील नागरिकांनी अर्ज केले. त्यावर त्यांनी त्यावेळी या रस्त्याची समस्या पुढच्या १० ते १५ दिवसात मार्गी लावतो अशी ग्वाही दिली होती. त्यालाही जवळपास ३ महिने होत आहे आणि रास्त मात्र जसाच्या तसाच आहे, महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत आता वार्डातील नागरिक व विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत या खड्ड्यात बेशरमाची झाडे लावत आंदोलन केले.

Comments
Loading...