Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Potato Juice | टीम कृषीनामा: बटाट्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. बटाट्याचे मदतीने त्वचेवरील चमक वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही बटाट्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर बटाट्याच्या रसाच्या मदतीने त्वचेवरील डागही दूर होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने बटाट्याच्या रसाचा वापर करू शकतात.

बटाट्याचा रस आणि टोमॅटो (Potato juice and tomatoes-For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसामध्ये टोमॅटोचा पल्प मिसळू शकतात. बटाट्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला बटाट्याच्या रसामध्ये टोमॅटोचा पल्प मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून तीन वेळा वापर करू शकतात.

बटाट्याचा रस आणि हळद (Potato juice and turmeric-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसात हळद मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला बटाट्याच्या दोन चमचे रसामध्ये चिमूटभर हळद मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग दूर होऊ शकते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार होते.

बटाट्याचा रस आणि मध (Potato juice and honey-For Skin Care)

मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही बटाट्याच्या रसात मध मिसळून चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे बटाट्याच्या रसामध्ये दीड चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा ताज्या पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा सहज करू शकतात. याच्या मदतीने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेचा रंग देखील सुधारतो.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याचे फेशियल केल्यानंतर त्वचेवरील चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करू शकतात.

विटामिन सी सीरम (Vitamin C Serum-For Skin Care)

फेशियल केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर विटामिन सीरम लावू शकतात. विटामिन सी हे सर्व प्रकारच्या त्वचेवर काम करते. त्याचबरोबर विटामिन सी सीरम प्रदूषण आणि उन्हाच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. याच्या मदतीने चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. त्यामुळे फेशियलनंतर तुम्ही चेहऱ्यावर विटामिन सी सीरम लावू शकतात.

गुलाब जल (Rose water-For Skin Care)

फेशियल केल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असेल तर गुलाब जल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुलाब जलच्या मदतीने त्वचा थंड राहते. त्याचबरोबर फेशियल केल्यानंतर पिंपल्स टाळण्यासाठी गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही गुलाब जलचा वापर टाळायला हवा. तर दुसरीकडे तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल तर गुलाब जलचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय