खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच विरणार?; डेडलाईनचा आज शेवटचा दिवस

टीम महाराष्ट्र देशा: राज्यभरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांसह विरोधीपक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी १५ दिसेंबरची डेडलाईन दिली होती.या डेडलाईनच आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्यापही अनेक रस्त्यावर जैसे थेच परिस्तिथी असल्याच दिसत आहे. त्यामुळे पाटील यांनी घोषणा हवेतच विरली असल्याच दिसत आहे.

30 ऑक्टोबर रोजी चंद्रकांत पाटील यांनीखड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी सरकारी डेडलाईन जाहीर केली होती. 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र सध्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर खड्डे असल्याच दिसत आहे.

१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या नाशिक विभागात ८४,१४ टक्के तर पुणे विभागात 88.9४ टक्के रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाल्याच ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.

 

 

 

You might also like
Comments
Loading...