‘३५ अ’ कलम संदर्भातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरसंदर्भातील घटनेतील ‘३५ अ’ कलम रद्द करावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे .

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे या प्रकरणी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. डॉ. चारू वली खन्ना यांनी यासंबंधित याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे, असे न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले.