‘लालूंच्या’ शिक्षेवरची सुनावणी आजही टळली

lalu prasad yadav

टीम महाराष्ट्र देशा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि अन्य दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र सुनावणी आजही टळल्याचे समजते.

Loading...

१९९१ ते १९९४ या काळात लालू प्रसाद मुख्यमंत्री असताना चारा घोटाळा समोर आला होता. त्यातल्या एका खटल्याची लालूंना आधीच शिक्षा झाली आहे. आज होणाऱ्या चारा घोटाळ्याच्या खटल्यात लालूंना ३ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने वकील विंदेश्वरी प्रसाद यांचे निधन झाल्यामुळे शिक्षेवरची सुनावणी आज गुरवारी होणार होती.

काय आहे चारा घोटाळा प्रकरण

लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असतांना १९९० ते १९९७ च्या दरम्यान पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात ३ वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी आहेत. तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.Loading…


Loading…

Loading...