लोकसभेची सेमीफायनल- – “टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर”

blank

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश मध्ये अजून चित्र अस्पष्ठ आहे.

तरीही अंतिम निकाल लागण्याआधीच जागोजागी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत राहुल गांधींना विजयासाठी शुभेच्छा देताना होर्डींग लावण्यात आले आहेत. या होर्डींगवर ‘टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर…’ अश्या प्रकारची हेडिंग लिहण्यात आलेली आहेत.