‘गोलमाल अगेन’चं पोस्टर प्रदर्शित

-golmaal5

गोलमाल या चित्रपट मालिकेतला पुढचा भाग अर्थात ‘गोलमाल अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून , येत्या दिवाळीत फटाक्यांसोबत हसवण्याची आतिषबाजी करायला ही टीम पुन्हा सज्ज झाली आहे.अभिनेता अजय देवगण याने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

Loading...

golmaal-again
‘गोलमाल- फन अनलिमिटेड’ या नावाचा चित्रपट २००६मध्ये येऊन गेला. अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि शर्मन जोशी या चार कलाकारांनी त्यात घातलेला धुडगूस तुफान लोकप्रिय झाला. त्यानंतर ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल ३’ या दोन सिक्वलनीही प्रेक्षकांमध्ये धमाल उडवून दिली. आता या नव्या सिनेमाचं पोस्टर अजय देवगण याने आपल्या ट्विटर हँडलवरून प्रदर्शित केलं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी असून या पोस्टरमध्ये गोलमाल या नावात लिंबू-मिरची दिसत आहे. ‘इस दिवाली लॉजिक नही, सिर्फ मॅजिक’ या कॅप्शनवरून तरी हा चित्रपट डोकं बाजूला ठेवून नुसतं हसण्यासाठी बनवल्यासारखा वाटतोय. आता चित्रपटात नेमकं काय आहे हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळेल. सध्यातरी या पोस्टरवरून प्रेक्षकांना टीझर आणि ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.Loading…


Loading…

Loading...