fbpx

पिंपरी : ‘शिवडे आय एम सॉरी’नंतर आता स्मार्ट बायका कुठे जातात ?

पिंपरी : स्मार्ट बायका कुठे जातात अशा आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलांबद्दल अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या जाहीर कृतींमुळे शहर वेगळ्या अर्थाने चर्चेत आले असून सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

एका प्रेमवीराने प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी’ अशा आशयाची फलेक्सबाजी केल्याचा विषय चर्चेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच,खंडोबा माळ चौक, आकुर्डी, तसेच साने चौक चिखली या परिसरात वर्दळीच्या ठिकाणी ‘स्मार्ट बायका जातात कुठे’ अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. दर्शनी ठिकाणी हे फ्लेक्स असल्याने सहज नजरेत येत आहेत. स्मार्ट बायका जातात कुठे हे मोठ्या आकारातील अक्षरात लिहिलेले आहे. त्या मजकुराखाली या जागेवर लक्ष ठेवा, १५ आॅक्टोबर असेही लिहिले आहे.

दरम्यान,हे फ्लेक्स कोणी लावले ? महापालिकेच्या आकाशचिन्ह परवना विभागाकडून परवानगी घेतली आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. नवरात्रोत्सव अर्थात दुर्गा उत्सव सुरू असताना, महिलांच्यादृष्टीने अवमानकारक ठरेल असे फलक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचू शकते, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

महिलांसाठी फुल बॉडी मसाज देण्यासाठी चक्क युवकांना, पुरुषांना फोन

3 Comments

Click here to post a comment