राफेल चोरचे पोस्टर रिलायन्स समूहाच्या कार्यालयावर..

मुंबई : राफेल प्रकरण शांत होण्याचे नावचं घेत नाहीये. आता काँग्रेसने थेट रिलायन्स समूहाच्या कार्यालयावर पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून मुंबईतल्या सांताक्रुझ विभागातल्या अनिल अंबानींच्या कार्यालयाच्या इमारतीवर पोस्टर लावण्यात आले. ज्यामध्ये राफेल विमानासोबत अनिल अंबानींचा फोटो होता. त्यावर राफेल चोर असे ही लिहण्यात आलं होतं. या फ्लेक्सवर काँग्रेस पक्षाचाही उल्लेख आहे. मात्र, या पोस्टरची माहिती कंपनीला मिळतात, हे पोस्टर त्वरित उतरवण्यात आले. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मात्र अजूनही काँग्रेसकडून हे प्रकरण लावून धरण्यात आलं आहे.  या प्रकरणी  चौकशीची मागणी काँग्रेस करीत आहे. तर दुसरीकडे याबाबत अंबानी परिवारालाही यात लक्ष्य करण्यात येत आहे.

मुंबईच्या सांताक्रुझ येथे असलेल्या रिलायन्सच्या कार्यालयावर अनिल अंबानी यांचे राफेल बाबत विवादास्पद पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर एका बाजूला अनिल अंबानी यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला राफेल विमानाचा फोटो लावण्यात आला होता. यावर राफेल चोर असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. तसेच या फ्लेक्सवर काँग्रेस पक्षाचा देखील उल्लेख होता. हे पोस्टर काही वेळातच रिलायन्सच्या सुरक्षारक्षकांनी काढले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?